आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinanath Mangeshkar Award To Pandit Suresh Talwalkar

पं. सुरेश तळवळकर यांना मंगेशकर पुरस्कार, दिलीप प्रभावळकर, केतकर यांचाही गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रसिद्ध तबलावादक पं. सुरेश तळवळकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांना यावर्षीचे दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्यातील योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

आदिनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पुरस्काराचे इतर मानकरी असे : आशा कामत (कर्तृत्ववान महिला, आनंदमयी पुरस्कार), अपर्णा अभ्यंकर (आदिशक्ती पुरस्कार), नाट्य निर्माता अशोक नारकर (मोहन वाघ पुरस्कार) यांचा समावेश आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २४ एप्रिलला दुपारी ४ वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही उपस्थित राहतील. सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १ लाख १ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.