आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीला मिळालाय कुबेराचा आर्शीवाद, जवळ आहे अब्जावधीची संम्पत्ती आणि रोल्स रॉयस कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धनत्रयोधशीचा दिवस म्हणजेच कुबेराच्या आराधनेचा दिवस असतो. या मुहूर्तावर आम्ही आपल्याला एका अशा व्यक्तीची माहिती आहोत ज्यावर कुबेर प्रसन्न आहे. ही व्यक्ती म्हणजेच बेंगळुरूत राहणारे रमेश बाबू हे आहेत. रमेश यांची केशकर्तनालये असून ते लवकरच मुंबईसह देशभरात केशकर्तनालच्या शाखा उघडणार आहेत. रमेश बाबू हे कधीकाळी अतिशय सर्वसामान्य आयुष्य जगत होते. पण आपली दुरदृष्टी, मेहनत आणि जिद्द या जोरावर ते अब्जाधीश झाले आहेत. त्यांच्याजवळ रोल्स रॉयस, मर्सडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी सारखी लक्झरी वाहने आहेत. 
 
आई करत होती लोकांच्या घरात काम
- 43 वर्षीय रमेश बाबु बेंगलुरू येथील अनंतपूरमध्ये राहतात. रमेश 7 वर्षांचे होते त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते बेंगलुरु येथील चेन्नास्वामी स्टेडियमलगत आपले केशकर्तनालय चालवतात.
- रमेश यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई घर चालविण्यासाठी लोकांच्या घरी जेवण बनवून द्यायची. त्यांनी आपल्या पतीचे दुकान केवळ 5 रुपये महिना एवढ्या भाड्याने दिले होते.    
 
सुरु केली टूर आणि ट्रँव्हल्स कंपनी
- अतिशय कठिण परिस्थिती असतानाही रमेश बाबू यांनी शिक्षण सोडले नाही. 12 वी नापास झाल्यावर त्यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंन्स्टिटयूटमधुन इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. 
- 1989 मध्ये त्यांनी आपल्या वडिलांचे दुकान पुन्हा सुरु केले. त्यांनी हे दुकान आधुनिक पध्दतीने बनवुन चांगले पैसे कमावले यातुन त्यांनी एक मारुती व्हॅन खरेदी केली. ही कार ते स्वत: चालवू शकत नसल्याने त्यांनी ती भाड्याने देण्यास सुरुवात केली. 2004 मध्ये त्यांनी रमेश टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सची सुरुवात केली.
 
आज आहेत 256 कार 
- रमेश बाबू यांच्याकडे आज 256 कार आहेत. यात 9 मर्सडीज, 6 बीएमडब्ल्यू, एक जगुआर आणि तीन ऑडी कार आहेत.  
- रॉल्स रॉयस सारखी महागडी कारही ते चालवतात. या कारचे एका दिवसाचे भाडे 50,000 रुपये आहे. रमेश बाबू यांच्याकडे 60 वाहनचालक कामाला आहेत. पण आजही ते आपले काम स्वत: करतात.
 
अमिताभपासून ते शाहरुख पर्यंत त्यांचे क्लाइंट्स
- लक्झरी टॅक्सी सर्व्हिस सुरु केल्यानंतर रमेश बाबू यांची क्लाइंट लिस्ट वाढत गेली.
- अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि शाहरुख खान सारख्या बॉलिवुड सेलिब्रेटी त्यांच्या क्लाइंट आहेत. 
बातम्या आणखी आहेत...