आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानला सिनेसृष्टीत सर्वप्रथम संधी देणारे दिग्दर्शक लेख टंडन यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुप्रसिध्द अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक लेख टंडन यांचे रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. मागील 5 ते 6 महिन्यापासून ते आजारी होते. पवई येथील आपल्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्या कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. 
 
लेख टंडन यांचे गाजलेले चित्रपट
उत्तरायण, आम्रपाली, प्रोफेसर, झुक गया आसमान, जहा प्यार मिले, आंदोलन, दुल्हन व्ही जो पिया मन भाये, शारदा, एक बार कहो, अगर तुम ना होते, दुसरी दुल्हन, मिल गयी मंजिल मुझे त्यांचे हे चित्रपट गाजले. त्याचा जन्म  13 फेब्रवारी 1929 रोजी लाहोर येथे झाला होता. त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांनी प्रेरित केले होते. पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. शाहरुख खानला त्यांनी दिल दरिया या मालिकेत सर्वप्रथम संधी दिली होती. फरमान या टीव्ही सीरियलचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...