आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा\'च्या संचालकपदी प्रथमच मराठी नाट्यदिग्दर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. मूळचे बीडचे असलेले वामन केंद्रे सध्या मुंबई विद्यापीठाच्या 'अकादमी ऑफ थिएटर आर्ट्‍स' प्रमुख आहेत.

वामन केंद्रे यांची 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या (एनएसडी) संचालकपदी विराजमान होणारे पहिले म‍राठी व्यक्ती आहे.
या पदासाठी देशभऱातून 60 अर्ज आले होते. यात वामन केंद्रे, अब्दुल लतिफ खटाना आणि अरुंधती नाग या तिघांमध्ये स्पर्धा होती.
वामन केंद्रे यांनी भासकवी रचित ‘मध्यमव्यायोग’ या संस्कृत नाटक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सादर केले होते. त्याशिवाय ‘अशी बायको हवी’, 'एक झुंज वा-याशी', 'चार दिवस प्रेमाचे', 'झुलवा', 'रणांगण', 'नातीगोती', 'राहिले दूर घर माझे', 'वेधपश्य', अशी अनेक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर विशेष गाजली आहेत.
नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. त्यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (2012) मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कारा’नेही त्यांना गौरवण्यात आले आहे.