आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसी सोडताना दु:ख : अमिताभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणा-या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या सहाव्या सेशनचा शेवटचा भाग 26 जानेवारी रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. ‘या शेवटच्या भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर दु:ख वाटत असले तरी मला केबीसी करण्यासाठी विचारले तर मी पुन्हा हा शो करेल’, असे अमिताभ यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.

तिस-या भागाचा अपवाद वगळता पाचही शोमध्ये अमिताभ यांनी सूत्रसंचालन करून रसिकांच्या मनावर जादू केली होती. तिस-या भागाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शाहरुखने सांभाळली होती.
‘एबीसीएल’ कंपनी डबघाईला आल्यानंतर बच्चन आपल्या कारर्कीदीत झगडत असताना ‘केबीसी’ या शोने त्यांना पुन्हा त्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. शेवटच्या भागाची काही छायाचित्रे बच्चन यांनी ब्लॉगवर अपलोड केली आहेत. सहाव्या भागात सन्मीत कौर यांनी पाच कोटींचे बक्षीस जिंकले होते.