आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Disaster Management Subject Incepted In Syllabus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आपत्ती व्यवस्थापन विषय अभ्यासक्रमात सक्तीचा करा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर वर्षातून एकदा नव्याने प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापन विषय अनिवार्य करावा, अशी सूचना मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी केली.

एसएनडीटी महिला विद्यापीठामार्फत ‘आव्हान २०१५ - राज्यपालांचे दल’ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा समाराेप मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला, त्या वेळी खडसे बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत उपस्थित होते. ‘प्रशिक्षित युवकांना सुरक्षा यंत्रणेत भरती करताना प्राधान्य दिले जाईल,’ असेही खडसे म्हणाले.