आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त खड्ड्यांचे, चर्चा मात्र विधान परिषद अाखाड्याची; चंद्रकांत पाटील व ठाकरेंची चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सात डिसेंबरच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी  भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. तथापि, आमच्यात राजकीय नव्हे तर रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा झाली, असा खुलासा पाटील यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बाेलताना केला. 


निवडणुकीची राजकीय चर्चा मुख्यमंत्री व उद्धव हेच करतील, असेही पाटील म्हणाले. भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना सांगितल्याचे समजते.पोटनिवडणुकीत राणे उभे राहिल्यास शिवसेना त्यांना विरोध करणार आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार दिल्यास शिवसेना पाठिंबा देईल का यावर दोघांत चर्चा झाल्याचे कळते. 


नारायण राणे यांच्याऐवजी भाजपतर्फे उमेदवार दिला जाईल असे म्हटले जात आहे. यात माधव भंडारी, प्रसाद लाड, शायना एनसी आणि प्रमोद जठार या प्रमुख नावांचा समावेश आहे.  मात्र शिवसेना माधव भंडारी आणि प्रसाद लाड यांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी असल्याने शायना एनसी वा प्रमोद जठार यांना शिवसेना पाठिंबा देऊ शकते. परंतु या चार नावांऐवजी आणखी वेगळेच नाव समोर येऊ शकते अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

 

सीएम-उद्धव पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पाटील म्हणाले, उद्धव यांना खड्ड्यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली. शुक्रवारी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री प. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात अाहेत. दोघांनी एकाच विमानाने जाण्याची विनंती केली. परंतु दोघांच्या वेळा वेगळ्या असल्याने ते शक्य होणार नाही, असे दिसते.

बातम्या आणखी आहेत...