आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’त अंतर्गत कलह: सुनिल तटकरेंविरोधात वाढता असंतोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात प्रचंड असंतोष असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. िवशेष म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह माजी मंत्री िजतेंद्र आव्हाड आणि खुद्द तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे हे प्रदेशाध्यक्षांच्या एकाधिकारशाहीला कंटाळल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी िदली.

भाजपच्या वाटेवर असलेले भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी मध्यस्थी केली असली तरी त्याचा फारसा उपयाेग झालेला दिसत नाही. जाधव भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. तर िचपळूणमधील जाधव समर्थकांनी नगरसेवकांनी िशवसेनेत जाण्याची तयारी केली असल्याचे कळते. मूळ शिवसैनिक जाधवांना पुन्हा शिवसेनेत जायला निश्चित आवडले असते, पण त्यांना पक्षात प्रवेश देण्यास पक्षप्रमुखांचा विरोध असल्याचे कळते.

जाधव यांचा गुहागर मतदारसंघ वगळता सध्या रत्नागिरी िजल्ह्यात िशवसेनेचे वर्चस्व आहे. मेरी टाइम बोर्डचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते संदेश पारकर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केल्याने खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जाधव पक्षाबाहेर पडल्यास जिल्ह्यात अस्तित्व शाेधण्याची वेळ येईल. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाधव यांना बुधवारी भेटायला बोलावले होतेेे. या भेटीत त्यांनी िचपळूण नगर परिषदेचा अपवाद वगळता तुम्ही रत्नागिरी िजल्ह्याचा िवचार करा आणि तेथे पक्षाचे नेतृत्व करा, अशा सूचना दिल्याचे कळते. मात्र, सध्या अापल्याच पक्षातून विराेधकांना ‘ताकद’ पुरवण्याचे काम हाेत असल्याने काम करणे अवघड हाेत असल्याचे जाधवांनी पवारांना सांगितल्याची माहिती अाहे. मात्र पवारांशी चर्चेनंतर जाधव यांची कोंडी झाली असून त्यांचा शब्द डावलून भाजपमध्ये जाण्याचे धाडस जाधवांत नसल्याचीही चर्चा अाहे.

आमदारकीचा राजीनामा जाधव भाजपात गेल्यास पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी सारी ताकद िशवसेनेच्या मागे उभी करून अापल्याला पराभूत व्हावे लागेल, अशी भीती जाधव यांना वाटते. यामुळे जाधव यांना भाजपकडून एखादे महामंडळाचे पद िकंवा िवधान परिषदेचा शब्द हवा आहे.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या घरात तीन आमदार अाहेत. स्वत: सुनील तटकरे त्यांचे बंधू अनिल हे िवधान परिषदेवर अाहेत. तर अनिल यांचे िचरंजीव अवधूत श्रीवर्धनचे आमदार आहेत. सुरुवातीला तटकरे घराण्याचा राजकीय वारसा अवधूत पुढे नेतील असे वाटत होतेे, पण सुनील तटकरे यांची कन्या अदिती मुलगा अनिकेत अाता सक्रिय झाले आहेत. अदिती पक्ष संघटनेत तर अनिकेत हे रोहा माणगावमध्ये सक्रिय आहेत. विधानसभेला श्रीवर्धनमधून अवधूतला संधी देतात की अनिकेतला असा वाद झाल्याचे बाेलले जाते. मात्र या कलहातून मार्ग काढताना तटकरेंनी पुतण्याला जागा दिली हाेती. असे असले तरी गेल्या काही महिन्यांपासून काका पुतण्याचे संबंध िबघडल्याचे चित्र अाहे.

ठाणे िजल्ह्यात राष्ट्रवादीत िजतेंद्र आव्हाड, वसंत डावखरे गणेश नाईक अशी तीन स्वतंत्र संस्थाने अाहेत. त्यांना एकत्र अाणण्यात खुद्द शरद पवारांनाही यश अालेले नाही. ठाणे जिल्ह्यातील पक्षाची पडझड हाेत असताना अाव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरात मात्र पक्षाची ताकद िटकवून ठेवली आहे. छगन भुजबळानंतर पक्षात अाक्रमक अाेबीसी चेहरा म्हणूनही पवारांना अाव्हाड हवे अाहेत. मात्र, हेच तटकरेंना नकाे असल्याचे कळते.

पक्षांतर्गत नाराजी नाही
पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भास्कर जाधव हे राष्ट्रवादीचे नेते असून माझ्याशी ते संपर्कात आहेत. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या आलबेल नसल्याचे बोलले जात असले तरी या केवळ अफवा आहेत. मी त्याच्यावर िवश्वास ठेवणार नाही.
-सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

जितेंद्र आव्हाडांना खंदा समर्थक नाही
पक्षाध्यक्ष शरद पवार सोडले तर आव्हाडांना राष्ट्रवादीत खंदा समर्थक नाही. आव्हाडांचे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे तटकरेंसह अजित पवार यांनाही आवडत नाही. मध्यंतरी ठाण्यातील एका बिल्डरच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारवाईचे बालंट आल्यानंतर तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहिले नसल्याची खंत अजूनही बाेलून दाखवली जाते. या नाराजीचा पुढील वर्षी हाेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो अशी चिन्हे अाहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी अाधीच िशवसेनेत प्रवेश केला आहे.
बातम्या आणखी आहेत...