आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Result Live, Eknath Khadse & Pankaja Munde\'s Panel Win

जिल्हा बॅंक निकाल: खडसे - पंकजांचा NCP ला दणका, चव्हाणांना धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय जनता पक्षाचे मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी अनुक्रमे जळगाव आणि बीड जिल्हा सहकारी बॅंकेत राष्ट्रवादीला दणका देत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जळगाव बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पॅनेलने 21 जागांपैकी 19 जागा विजय खेचून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या पॅनेलने 21 पैकी 16 जागा जिंकल्या आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खडसे यांच्या नेतृत्वाखालील 'सहकार' पॅनेलने बॅंक ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यानुसार खडसेंच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. खासदार जैन यांच्या 'लोकमान्य' पॅनेलला किती जागा मिळतात याकडेही लक्ष होते. मात्र जैन यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.
सोसायटी मतदारसंघातील जामनेर, भडगाव आणि पाचोरा मतदारसंघात एकतर्फी लढती झाल्या व भाजपने या जागा सहज खिशात टाकल्या. जामनेरमध्ये गिरीश महाजन व पाचोऱ्यात किशोर पाटील मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले. तसेच भडगाव येथून नानासाहेब देशमुख यांनी सहज विजय खेचून आणला. चाळीसगावमध्ये राजीव देशमुख, बोदवडमध्ये अॅड. रवींद्र पाटील, रावेरमध्ये अरुण पाटील यांनी विजय मिळवला आहे. अमळनेरमध्ये अनिल पाटील, भुसावळमध्ये संजय सावकारे हे विजयी झाले आहेत.
पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम- बीड जिल्हा बॅंकेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला दणका दिला आहे. आतापर्यंत 21 जागांपैकी 14 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यातील पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने 16 जागा जिंकल्या आहेत. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाखाली तीन जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का- नांदेड जिल्हा बॅंकेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना धक्का बसला आहे. 21 जागांपैकी अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनेलला केवळ 5 जागा जिंकता आल्या. तर सर्वपक्षीय विरोधी शेतकरी सहकारी पॅनेलने 16 जागांवर विजय खेचून आणला. नांदेडमध्ये अशोक चव्हाण (काँग्रेस) विरूद्ध सर्वपक्षीय (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) असा सामना रंगला होता. यात चव्हाणांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. परभणी व अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम ठेवली आहे.
धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता कायम- धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता अबाधित आपल्याकडे ठेवली आहे. आज झालेल्या मतमोजणीत 21 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने 14 जागा जिंकत सत्ता राखली.
पुढे वाचा, सांगलीत जयंत पाटील अन् पतंगराव यांच्यात काँटे की टक्कर पण बाजी जयंतरावांनीच मारली...
मुंबईत प्रथमच भाजपची सत्ता, दरेकरांचे एकतर्फी वर्चस्व...