आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divakar Ravate Talk On Maharashtra Legislative Assembly

मराठवाडा हे सवतीचं पोर : रावते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनुशेष दूर करण्याबाबत राज्यपालांच्या निर्देशांनंतरही राज्य सरकार मराठवाड्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अपूर्ण राहिलेली चर्चा विधान परिषेदत दुपारच्या सत्रात पार पडली. त्या वेळी रावते बोलत होते.

राज्यपालांच्या अभिभाषणात मराठवाड्याचा नामोल्लेख नसल्याबद्दल रावते यांनी खेद व्यक्त केला. राज्यपालांच्या भाषणात केवळ पश्चिम महाराष्ट्रामधील विकास योजनांवरच भर होता, असे नमूद करत मराठवाड्याला लढल्याशिवाय काही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

युती शासनाच्या काळात पडलेल्या दुष्काळात तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मराठवाड्यात आठ दिवस मुक्काम ठोकला होता, अशी आठवण सांगून विद्यमान राज्यपालांनी दुष्काळी भागात एकही दौरा न केल्याबद्दल रावते यांनी खंत व्यक्त केली. सुरेश नवले, निरंजन डावखरे, शोभा फडणवीस, राम पंडागळे, डॉ. दीपक सावंत, जयदेव गायकवाड, भाई गिरकर, अनिल परब, विद्या चव्हाण यांनी अभिभाषणावरील चर्चेत भाग घेतला. सोमवारी मुख्यमंत्री अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.

‘कोरडवाहू’ धोरणाचे वचन पाळले नाही
कोरडवाहू धोरण जाहीर करण्याचे वचन शासनाने मागील अधिवेशनामध्ये दिले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्याप कोरडवाहू धोरण शासनाने सादर केले नसल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी चर्चेवेळी केला.