आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण गणपती चोरी प्रकरण: 5 आरोपींना आजन्म कारावास, 2 सोनारांना 9 वर्षाची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.
मुंबई- दिवे आगारमधील सुवर्ण गणपती चोरी प्रकरण 5 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर 2 सोनारांना 9 वर्षे व 3 महिलांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  आरोपींमध्ये कैलास विक्रम भोसले (वय 23) व सतीश ऊर्फ पिंट्या गेणू काळे (वय 19, दोघेही रा. घोसपुरी वस्ती, नगर) आणि मूर्ती वितळविण्यास मदत करणारी महिला यांचा समावेश आहे.
 
कोकणात 24 मार्च 2012 ला ही घटना घडली होती. यात महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोघांचा मृत्यू झाला होता. तर सुवर्ण गणेशाची प्राचिन मुर्ती दरोडेखोरांनी जवळपास दिड किलो सोन्याची गणेश मुर्ती दरोडेखोरांनी लुटून नेली होती.  या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशन मध्ये 12 जणांविरुध्द भादवी कलम  396.397, 120 ब, 201, 412 आणि महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999 अर्थात मोक्काच्या कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती.  या प्रकरणी तपासी अधिकारी संजय शुक्ला आणि वि वी गायकवाड यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये दोषारोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले होते. तेव्हा पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. विशेष मोक्का न्यायाधिश के आर पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकुण 104 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासी अधिकारी, पंच साक्षीदार, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, सिसीटिव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
 
मंदीरातील सिसीटिव्ही कॅमेरयात कैद झालेल्या आरोपींचे शुटींग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलीसांना यश आलेआहे. याशिवाय दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या पहारी, चोरीला गेलेली दानपेटी, आरोपींकडून 1 किलो 246 ग्रॅम सोन्याची लगडी हस्तगत करण्यात पोलीसांना आलेले यश महत्वपुर्ण ठरले. या प्रकरणात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फ 9 वकीलांनी आपली बाजू मांडली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...