आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय मुख्यालयात मिळेल ‘दारात न्याय’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अन्यायग्रस्तांच्या तक्रारी ऐकण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोग राज्यातील सर्व सहा विभागांच्या मुख्यालयी तीन दिवसांचा कार्यक्रम सुरू करत आहे. मुंबईला बोलावण्याऐवजी विभागीय मुख्यालयी येणे सोपे असल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. ‘दारात न्याय’ असे या उपक्रमाचे नाव आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. आर. बन्नूरमठ यांनी ही माहिती दिली. पहिल्या दिवशी तक्रारी ऐकल्या तर दुस-या दिवशी सरकारी अधिकारी-कर्मचा-यांसाठी कार्यक्रम घेतला जाईल. तिस-या आणि अंतिम दिवशी जनजागृती कार्यक्रम घेतला जाईल.