आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला हवे होते मूल, पत्नीला फिगरची काळजी, अखेर घटस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लग्नानंतर पतीला मूल हवे होते, परंतु पत्नीला फिगर मेंटेन ठेवायची होती. त्यामुळे मूल होऊ नये म्हणून पतीच्या माघारी ती गर्भनिरोधक औषधी घेत होती. याचा उलगडा झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय सुनावला. या दांपत्याचे 2011 मध्ये लग्न झाले होते. वर्षभर ते एकत्र होते. 25 वर्षीय पत्नी नोकरीस असून, सध्या वेगळे राहत होती. 31 वर्षीय पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दरम्यान, न्यायालयाच्या नोटिसीस पत्नीने उत्तर न दिल्याने एकतर्फी निकाल देण्यात आला.