आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Analyses: Politics Behind Non Aided School Converted Into Aided

दिव्य मराठी विश्‍लेषण: निवडणूक तोंडावर ‘प्रचारक’ केले खुश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात 7 लाख शिक्षक आहेत. मोठ्या निवडणुकांत खासगी शाळा-संस्थांमधले शिक्षक प्रचारातील बिनीचे शिलेदार असतात. त्यामुळेच पाचवा वेतन आयोग व कायम शब्द वगळण्याच्या प्रलंबित मान्य मागण्या मंजूर करत शिक्षकांना चांगलेच खुश करून शासनाने तोंडावर आलेल्या निवडणूक प्रचारातील अडथळा दूर केल्याचे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.
प्रचारक खुश तर प्रचार जोशात : राज्यातल्या खासगी संस्था मुख्यत्वे काँग्रेस-राष्टÑवादीच्या आहेत. या शिक्षकांना नेहमीच प्रचाराच्या कामांना जुंपले जाते. त्यामुळे ‘प्रचारक खुश तर प्रचार जोशात,’ या तत्त्वाने आजचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे म्हणण्यास फारच वाव आहे.
निवडणुका आल्या की... : 2001 मध्ये संस्थाचालकांनी आम्ही कदापि अनुदान मागणार नसल्याचे हमीपत्र दिले होते. तरीही शिक्षक कामावर गेले व ‘कायम’ शब्द वगळण्याची चळवळ सुरू झाली. 2009 मध्येच ‘विनाअनुदानित’ मधील ‘कायम’ शब्द वगळण्याचे शासनाने घोषित केले होते. त्याच्या अंमलबजावणीस आजचा दिवस उगवावा लागला. होता होईल ती आश्वासने देत कारभार पुढे रेटायचा व निवडणुका लागल्या की सर्व मागण्या मंजूर करायच्या, अशा प्रकारचा हा निर्णय आहे.
198 कोटींचा बोजा : कायम शब्द वगळल्यामुळे विद्यार्थ्यांची गळती थांबेल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आज सांगत आहेत. मग, दहावीनंतर वर्षाला दोन लाख विद्यार्थ्यांची होणारी गळती उर्वरित . पान 2
शासनाने इतके दिवस का थांबवली नाही, असाही प्रश्न विश्लेषक उपस्थित करत आहेत. अनुदानामुळे सरकारी तिजोरीवर पुढच्या वर्षापासून 198 कोटींचा बोजा पडेल. 50 हजार कोटीचा अर्थसंकल्प मांडणा-या महाराष्‍ट्रासारख्या राज्याला हा बोजा इतकाही मोठा नव्हता.
उपलब्ध होईल तसे अनुदान :
उच्च् व कॉलेज शिक्षकांना सहावा वेतन आयोग सध्या लागू आहे. तरी पाचव्या वेतन आयोगाच्या लाभासाठी बारावी परीक्षार्थींना गुरुजींनी यंदाही वेठीस धरलेच. कायम शब्द वगळल्यामुळे 22 हजार शिक्षकांना लाभ होणार आहे, असे शासन सांगत आहे. मात्र, शाळांना अनुदानासाठी 4 वर्षांचा टप्पा असून अनुदान उपलब्ध होईल तसे देण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय जल्लोष करण्यासारखा आहे, असे नाही.