आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Exclusive Report On Mantralaya Corruption

एक्सक्लुझिव्ह: लाचखोर अधिकाऱ्यांच्या बडतर्फीस सचिवांचाच नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शंभर रुपयांची का होईना पण लाच घेणारे अधिकारी, कर्मचारी शासनाची अब्रू वेशीवर टांगत असल्याने नियमानुसार त्यांना बडतर्फ करणे योग्य असले तरी अनेक विभागांचे सचिव या बडतर्फीस तयार नसल्याचे चित्र सचिवांच्या बैठकीत दिसून आले. गृह आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी मात्र या नियमानुसार कारवाई करणे योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यावर निर्णय घ्यावा असे ठरल्याने ते यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचे ठरवले असून कायद्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास त्याला त्वरित नोकरीतून बडर्तफ करावे असे सांगितले आहे. त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाईही झाली. परंतु अजूनही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे बाकी आहे. सचिवांच्या बैठकीला उपस्थित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले, लाचलुचपत अधिकारी त्यांना टीप मिळाल्यानंतर भ्रष्ट अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडतात. सध्याच्या नियमानुसार लाच घेताना एखाद्याला पकडले असल्यास त्याला त्वरित नोकरीतून बडतर्फ करावयाचे असते. यामुळे सरकारची प्रतिमा उंचावते. न्यायालयात कर्मचारी दोषी ठरला की त्याला नोकरीतून काढणे बंधनकारक आहे, त्याला किती शिक्षा द्यायची हा न्यायाधीशांचा अधिकार असतो. दोषी कर्मचाऱ्याने न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले तरीही त्याला नोकरीतून काढता येते; परंतु हा नियम अनेक सचिवांना ठाऊक नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना अजूनही बडतर्फ केलेले नाही. असे आठ कर्मचारी अजूनही नोकरीत आहेत. काही सचिवांचे म्हणणे होते की, एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला मुद्दाम गोवले जाते त्यामुळे त्याला संधी मिळाली पाहिजे म्हणून बडतर्फ न करणे योग्य आहे. परंतु अशी प्रकरणे समोर आली नसल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, आठ लाचखोर कर्मचारी अजूनही कामावर