आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Give Relaxation Actor Siddharth Jadhav

धावपळीतही ‘दिव्य मराठी’मुळे रिलॅक्स झालो - अभिनेता सिध्‍दार्थ जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपटांच्या प्रमोशनानिमित्त मी अनेक वर्तमानपत्रांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जात असतो, परंतु ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आलेला आजचा विलक्षण अनुभव मी आयुष्यात कधीही विसरणार नाही… मी प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, त्यांना हसवतो; परंतु आज मी असा आनंद घेणा-या प्रेक्षकांपैकी एक होतो आणि ‘दिव्य मराठी’ माझ्या भूमिकेमध्ये… गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या धावपळीच्या आयुष्यात आज ‘दिव्य मराठी’मुळे मी काही क्षण का होईना रिलॅक्स झालो, याबद्दल मी ‘दिव्य मराठी’चा अत्यंत ऋणी आहे, असे उद्गार मराठी सिनेसृष्टीचा आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ‘दिव्य मराठी’च्या मुंबई कार्यालयात गुरुवारी काढले. निमित्त होते त्याच्या आगामी ‘रझाकार’ चित्रपटाचे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माइंड रीडर आणि मोटिव्हेशनल ट्रेनर भूपेश दवे मुंबई येथील ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आले असता त्यांनी सिद्धार्थच्या थकलेल्या मनाचा थांग लावत त्याचेच मनोरंजन केले. सिद्धार्थला दवे यांना धन्यवाद देत ‘दिव्य मराठी’स ‘भव्य दिव्य मराठी’ म्हणण्याचा मोह आवरला नाही. ‘गेले दहा-पंधरा दिवस आम्ही ‘रझाकार’च्या प्रमोशनसाठी फिरून फिरून, बोलून बोलून दमलो होतो. पण ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आलो आणि रिलॅक्स झालो,’ हे उद्गार होते अभिनेता सिद्धार्थ जाधवचे.

माइंड रीडिंग या जादू क्षेत्रातील नव्या कौशल्यात निपुण असणा-या दवे यांनी सिद्धार्थला मनामध्ये विविध आकडे धरायला लावत विविध प्रात्यक्षिके दाखवली. त्यात त्यांनी चित्रपटाचा मुहूर्त अचूक कुठल्या वेळेला झाला इथपासून चित्रपट किती गल्ला जमवेल इथपर्यंतचे वेळेचे, गल्ल्याचे आकडे अचूक ओळखले नि सिद्धार्थला अचंबित व्हायला लावले. वेळोवेळी दवे यांच्या प्रत्येक प्रात्यक्षिकावेळी कधी श्वास रोखत तर कधी उत्स्फूर्तपणे ‘बाप रे...’ म्हणत सिद्धार्थ प्रतिसाद देत होता. एरवी आम्ही कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, पण आज दवे यांनीच आमचे मनोरंजन केले, असेही सिद्धार्थला म्हटल्यावाचून राहवले नाही.

दवे यांच्या या मनकवड्या जादूमुळे सिद्धार्थसह ‘रझाकार’चे दिग्दर्शक राज दुर्गे, अभिनेता नितीन जाधव, गौतम पाटीलही चकित झाले. प्रत्येकवेळी सिद्धार्थची दवे यांच्या जादूगिरीला येणारी उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्याच्या विनोदी कॉमेंट्स एकच हशा सगळ्यांमध्ये पिकवत होत्या. सरतेशेवटी सिद्धार्थ उठून उभा राहिला आणि पुढल्यावेळी दहा-पंधरा दिवस इतर टिकाणी जाऊन दमून आल्यावर दिव्य मराठीतच पुन्हा रिलॅक्स होण्यासाठी येईन, असे म्हणत त्याने दवे यांना नमस्कारच घातला.

भव्य दिव्य मराठी
प्रवास व प्रमोशनसाठी बोलून बोलून घसे बसले होते. शिवाय खूप थकलो होतो. पण दिव्य मराठीने खरोखरच भव्य दिव्य असल्याचा अनुभव दिला. दवे यांच्याशी भेट झाली नि त्यांनी मला व माझ्या टीमला आश्चर्यचकित तर व्हायला लावले.
सिद्धार्थ जाधव, अभिनेता

सिद्धार्थ सकारात्मक
दिव्य मराठीत आल्याने सिद्धार्थशी संवाद साधण्याची संधी मिळाली. एक सकारात्मक ऊर्जा असणारा कलाकारही अनुभवण्यास मिळाला.
भूपेश दवे, जादूगार