आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: रिक्षावाला बडे दिलवाला, होणार रोल मॉडेल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चालक संदीप बच्चे हे महिला दिन आणि राखीपौर्णिमेला महिलांना मोफत प्रवास, सद‌्वर्तनी ऑटोचालकांची माहिती फेसबुकवर देतात. - Divya Marathi
चालक संदीप बच्चे हे महिला दिन आणि राखीपौर्णिमेला महिलांना मोफत प्रवास, सद‌्वर्तनी ऑटोचालकांची माहिती फेसबुकवर देतात.
मुंबई- असे म्हटले जाते की, काम करण्याची वेगळी पद्धत आणि दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. मंुबईचे ऑटोचालक संदीप बच्चे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. खार आणि वांद्रे भागातील प्रत्येक जण त्यांच्याच ऑटोरिक्षाने जाण्यास उत्सुक असतो. त्यांच्या ऑटोची अॅडव्हान्स बुकिंग होते. ऑटोत फोन, वायफाय, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे आदी सुविधा आहेत. प्रथमोपचाराचाही बंदोबस्त आहे. एका बोर्डावर सोन्या-चांदीसह परकीय चलनाचे ताजे भाव लिहिले जातात. एक दानपेटीदेखील आहे. अंध प्रवाशांना ५०, अपंगांना २५ व नवविवाहितांसाठी प्रवासभाड्यात १० टक्के सवलत दिली जाते.

संध्याकाळी सात वाजेनंतर संदीप यांची दुसरी ड्यूटी सुरू होते. ते म्हणाले, गरजूंना कपड्यांचे वाटप करतो. लोकांच्या घरी जाऊन कपडे गोळा करतो. सत्कार्यांसाठी श्रीमंतच असावे असे नाही. चांगल्या कामांतूनही सत्कार्ये केली जाऊ शकतात. मी १४ वर्षांपासून ऑटो चालवतोय. २००० मध्ये आजारपणामुळे आईचे निधन झाले. मला कुणीच मदत केली नाही. गरजवंताचे दु:ख मला चांगलेच ठाऊक आहे. वृद्धाश्रमांतही जातो. देणग्यांतून खरेदी केलेली औषधे वाटतो. विनम्र वागणूक आणि लक्झरी ऑटोची मालकी असलेल्या संदीप यांना अाता महाराष्ट्र पोलिस रोल मॉडेल बनवण्याच्या तयारीत आहे.

मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये ऑटोचालकांच्या मनमानीच्या दरमहा १० हजार तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. सर्वाधिक प्रकरणे गैरवर्तनाची असतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठाणे येथील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी संदीप यांच्याशी संपर्क केला.

आता ते लवकरच पोलिसांकडून आयोजित कार्यशाळेत ठाणे आणि कल्याणमधील टोचालकांना सद्वर्तन आणि इमानदारीसह कमाई वाढवण्याचे कौशल्य शिकवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...