आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पंचायतीविरोधात आवाज उठवणारा ‘बंदुक्या’, जुंदरी झटक्याचे पहिल्यांदाच दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदूक्या  चित्रपटातील दृश्य. - Divya Marathi
बंदूक्या  चित्रपटातील दृश्य.
मुंबई - जात पंचायतीच्या वर्चस्वामुळे विविध जातींमधील नागरिकांवर खूप अन्याय होत असतो. अन्यायाविरोधात दाद मागण्याची हिंमत करणाऱ्याला मन मानेल ती शिक्षा जात पंचायत देते. देशाचा कायदा वगैरे त्यांच्या लेखी नसतो. जात पंचायत व्यवस्थेवर आवाज उठवणारा “बंदुक्या’ हा येत्या १ सप्टेंबर रोजी  प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी  यांनी  केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला विविध महोत्सवातून गौरवण्यात आले  आहे.  
 
दिग्दर्शक राहुल चौधरी  म्हणाले,  हरियाणा, पंजाब यासारख्या राज्यांत खाप पंचायतींच्या जुलमी नियमांमुळे विशिष्ट जातींमधील स्त्री-पुरुषांवर अन्याय  होतो.  त्याला यामुळे वाचा फुटली आहे. पण महाराष्ट्रात जात पंचायत व्यवस्थेवर  आजवर फारसे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. ही उणीव आता ‘बंदुक्या’  चित्रपटाच्या माध्यमातून भरून निघणार आहे. जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी राज्य सरकारने संमत केलेल्या जात पंचायतविरोधी कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यभरात हा कायदा लागू झाला.  या चित्रपटाने ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकने आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार या पुरस्कारांमुळे या चित्रपट गाजला.
 
जुंदरी झटक्याचे पहिल्यांदाच दर्शन   
खास “जुंदरी झटका’ म्हणून स्वतंत्र ओळख असणारी जुन्नर भागातली निखळ विनोदी भाषा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमतःच  प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात नामदेव मुरकुटे यांनी लिहिलेले “माझा ईर’ हे गाणे जुंदरी झटक्याचा अनुभव देईल. हे गाणे आदर्श शिंदे याने गायले आहे. या चित्रपटात अभिनेत्री अतिशा नाईक, शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, नीलेश बोरसे, अमोल बागूल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर अभिनेता नीलेश बोरसे यांचे चित्रपट क्षेत्रात प्रथम पदार्पण असल्याने मराठी सिनेसृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा आहेत.
बातम्या आणखी आहेत...