आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षाच्या पारशी तरूणीच्या प्रेमात पडले होते जिना, पळून जाऊन केले होते लग्न!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूटी पेटिट आणि मोहम्मद अली जिना (फाईल फोटो) - Divya Marathi
रूटी पेटिट आणि मोहम्मद अली जिना (फाईल फोटो)
नाशिक- मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानचे निर्माते असले तरी खासगी आयुष्यात ते सुधारणावादी व आधुनिकवादी होते. त्यांचे खासगी आयुष्य व त्यांचे राजकारण हा माझ्या दृष्टीने उत्सुकतेचा होता. त्यात त्यांचे वयाने 24 वर्षे लहान पारशी मुलगी रुटी पेटीट हिच्याशी झालेला विवाह व त्यांच्यामधील हळुवार नाते मला भावुक करणारे वाटले त्यातूनच मी 'मिस्टर ॲंड मिसेस जिना - द मॅरेज दॅट शूक इंडिया' या पुस्तकाचे लेखन केले, अशी प्रतिक्रिया शीला रेड्डी यांनी दिली.
 
शीला रेड्डी यांनी लिहले जिना-रूटींवर पुस्तक-
 
- दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी जिनांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग लेखिका शीला रेड्डी यांनी प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवले. डॉ. अंजना तिवारी यांनी शीला यांना बोलते केले. 
- जिना व रुटी पेटीट यांच्या संबंधाचा शोध घेताना अनेक संदर्भ मिळवण्यात चार वर्षे गेली. 
- हा शोध घेताना सरोजिनी नायडू व रुटी पेटिट यांची मैत्री व त्यांच्यामधील पत्रव्यवहार ( पेपर्स ऑफ पद्मजा नायडू ) पुस्तक लिहिण्यात कामी आला असे त्यांनी सांगितले. 
 
42 वर्षाच्या जिनांनी 16 वर्षाच्या मुलीसोबत पळून जाऊन केले लग्न-
 
- शीला रेड्डी म्हणाल्या, 42 वर्षाचे जिना आपल्यापेक्षा 24 वर्षांच्या लहान रुटी पेटिट हिच्या प्रेमात पडले. रुटीच्या सौंदर्यावर भाळून जिना तिच्याशी लग्न करण्याच्या दृष्टीने रुटीच्या वडिलांकडे गेले. 
- पण आंतरधर्मीय लग्नाचा जिनांचा प्रस्ताव रुटीच्या वडिलांनी साफ धुडकावून लावला. पण जिना खचले नाहीत त्यांनी रुटीला घरातून पळवून नेले व तिच्याशी लग्न केले. 
- या लग्नामुळे मुंबईतील पारशी व मुस्लीम समाजात त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पण जिनांनी आपल्या वकिली पेशाची, लोकप्रियतेची व राजकारणातील प्रतिमेची पर्वा केली नाही.
- त्यांनी हे नाते निभावून नेले. रुटीच्या अकाली निधनाने जिनांच्या आयुष्यात एकाकीपण आले व त्यांनी पाकिस्तान निर्मितीच्या राजकारणात स्वतःलाच समर्पित केले, असा आजपर्यंत माहित नसलेला एक ऐतिहासिक धागा शीला रेड्डी यांनी सांगितला.
 
बहिणीच्या शिक्षणासाठी होते आग्रही-
 
- जिना आपली लहान बहिण फातिमा हिच्या शिक्षणासाठी आग्रही होते. मुलींना आधुनिक शिक्षण मिळावे याबाबत ते उदारमतवादी होते. - त्याकाळातल्या मुस्लीम सनातन्यांचा विरोध त्यांनी मोडून फातिमाला काॅनव्हेंट शाळेत घातले व तिला डेंटीस्टही त्यांनी बनवले. 
- पत्नी रुटी हिच्या वयाच्या 29 व्या वर्षी झालेल्या अकाली निधनाने जिना एकाकी पडले होते. त्या काळात ते फातिमाच्या ते खूप जवळ गेले.
 
बॉम्बे गर्वनरची पत्नी आणि जिना यांची जिद्द-
 
- जिना व रुटी यांना एकदा बाॅम्बेचे गर्वनर विलिंग्डन यांनी भोजनासाठी बोलावले होते. त्यावेळी रुटी यांनी पारदर्शक साडी व ब्लाऊज असा वेष केला होता. 
- या पारंपारिक वेषेला विलिंग्डन यांच्या पत्नीने नापसंती दर्शवली व रुटीला लपेटण्यासाठी जिना यांनी तिला शाल द्यावी असे त्यांनी नोकरांना सांगितले. 
- या प्रसंगावर जिना यांनी तीव्र हरकत घेतली. तसेच विलिंग्डन जोपर्यंत मुंबईचे गर्वनर असतील तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला आपण हजर राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.
- हा निश्चय त्यांनी विलिंग्डन यांची मुंबईतील बदली होईपर्यंत पाळला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जिना आणि रूटीशी संबंधित काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...