आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM विशेष: मध्यावधीसाठी सत्ताधारीच जाेशात, विराेधक मात्र ‘काेमा’त; काँग्रेसमध्ये सामसूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाऊसपाण्याचा अंदाज घेऊन भाजपची निवडणूक तयारी, खासगी यंत्रणेमार्फत महाराष्ट्रात सर्व्हे सुरू
मुंबई (संजय परब)- मित्रपक्ष शिवसेनेच्या ‘उपद्रवा’मुळे त्रस्त असलेल्या भाजपने वेळ पडल्यास विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याची जय्यत तयारी सुरू केली अाहे. भाजपने २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली अाहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी एजन्सीच्या मार्फत देशभर चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
 
त्याच धर्तीवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही एक खासगी एजन्सीमार्फत राज्यात सर्व्हे केला जात अाहे.  या दोन्ही सर्व्हेंचा आधार घेऊन व यंदाच्या पावसाळ्यात पाऊसपाणी चांगला झाल्यास  गुजरात विधानसभा निवडणुकीबराेबरच महाराष्ट्रातही ‘बार’ उडवून देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा राज्यात पाऊस चांगला झाल्यास खरीप हंगाम चांगला होईल अाणि पुढील तीन महिने शेतकऱ्यांमध्ये सरकारविराेधात राेषही फारसा जाणवणार नाही, असे भाजपचे अाडाखे अाहेत.
 
सत्तेत असूनही भाजपला अडचणीत अाणण्याची एकही संधी न साेडणाऱ्या शिवसेनेची संगत भाजपला नकाे अाहे.  पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाध्यक्ष अमित शहाही महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता हवी अाहे.  सध्या देशभर भाजपला अनुकूल वातावरण असल्यामुळे ते शक्यही हाेईल, अशी अपेक्षा असल्याने भाजपने राज्यात मध्यावधीची तयारी सुरू केली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या लाेकसभा ते महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांत भाजपला भरघाेस यश मिळालेले अाहे. ज्या पालिकांत बाेटावर मोजण्याइतपत नगरसेवक हाेते तिथे चक्क महापाैरपद मिळवण्यापर्यंत भाजपने यश मिळवले अाहे. हीच ‘लाट’ कॅश करण्याची तयारी भाजपकडून केली जात अाहे.

तसेच मुख्यमंत्र्यांपासून ते अामदारांपर्यंत सर्वांनाच जनतेत जाऊन फीडबॅक घेण्याचे अादेश अाहेत. त्याचा एक भाग असलेली संवादयात्रा बुधवारपासून सुरू हाेत अाहे. शिवसेनेसह सर्वच विराेधी पक्ष कर्जमाफीसाठी अाग्रही असताना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भाजप सरकार काय काय करत अाहे, हे संवाद यात्रेतून भाजपचे नेते शेतकऱ्यांना सांगणार अाहेत.  
 
भाजपकडून देशभर पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू आहे. अमित शहा सर्व राज्यांच्या दाैऱ्यावर जात अाहेत. महाराष्ट्रातही ते येतील.  त्यावेळी  पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.  

सर्व्हेसाठी गावात पगारी व्यक्ती  
ज्या ठिकाणी भाजपचे खासदार किंवा आमदार नाहीत, अशा जागांचा सर्व्हे खासगी यंत्रणेमार्फत सुरू करण्यात अाला अाहे. यासाठी संबंधित मतदारसंघातील प्रत्येक गावात एक पगारी माणूस नियुक्त केला असून त्याला महिन्याला २५ हजार पगार देण्यात आला आहे. ही व्यक्ती महिनाभर त्या गावात राहून प्रत्येक घराचा सर्व्हे करत अाहे. यात संबंधित व्यक्तीची आर्थिक, सामाजिक माहिती तर घेईलच, पण राजकीय कलही जाणून घेईल. जूनच्या महिन्यात अमित शहा महाराष्ट्रात येत आहे. ते या सर्व्हेचे निष्कर्ष घेऊन पुढील रणनीती ठरवणार अाहेत.

सरकारचे निर्णय जनतेत पाेहाेचवण्याची धडपड
१९९५ मध्ये शिवसेना- भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकोपयोगी बऱ्यापैकी चांगली कामे झाली. पण, जनतेपर्यंत ती पोहोचली नव्हती. त्याचबरोबर लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा कामे करूनही लोकांशी तुटलेला संपर्क अाणि एकाच वेळी दोन्ही निवडणुका घेण्याच्या निर्णयाने युतीला फटका बसला अाणि केंद्राबरोबरच राज्यातही सत्ता गमावण्याची वेळ आली. या वेळी तसे होऊ नये म्हणून भाजप विशेष काळजी घेत आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेनेनेही थाेपटले दंड...
बातम्या आणखी आहेत...