आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे 4 वाजता सुरु होतो हा सिक्रेट बाजार, कवडीमोल किमतीत मिळतात येथे ब्रँन्डेड वस्तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीड गल्ली येथे हा सिक्रेट बाजार पहाटे 4 वाजता भरतो. इन्सॅटमध्ये येथे विकले जाणारे बॅंन्डेड शुज. - Divya Marathi
दीड गल्ली येथे हा सिक्रेट बाजार पहाटे 4 वाजता भरतो. इन्सॅटमध्ये येथे विकले जाणारे बॅंन्डेड शुज.
मुंबई- दिवाळीमुळे देशभरातील बाजारांमध्ये सध्या गर्दी ओसंडून वाहत आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बाजाराची माहिती देणार आहोत जो पहाटे 4 वाजता सुरु होतो. काही वेळातच येथे व्यापारी लाखोंचा व्यवहार करतात आणि गायब होतात. येथे तुम्ही ब्रँन्डेड सामान कवडीमोल किंमतीत घेऊ शकता. 
 
पहाटे 4 ते 8 या वेळेत भरतो हा बाजार
- हा बाजार कामठीपुऱ्यातील दीड गल्ली या भागात भरतो. पहाटे 4 वाजता सुरु होणारा हे मार्केट सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु असते. या बाजाराची सुरुवात 1950 मध्ये झाली. सुरवातीच्या काही दिवसात हा बाजार फक्त शुक्रवारी भरत होता. पण आता हा बाजार शुक्रवारी आणि गुरुवारी भरतो.
 
का आहे सिक्रेट हा बाजार
- मुंबईतील छोटया फॅक्टरींमधुन येथे हे सामान येते. त्यामुळे ते येथे अतिशय स्वस्त किमतीत मिळते. काही बॅंन्डेड कंपन्यांचे त्रुटी असलेले सामानही हे व्यापारी खरेदी करतात. ते दुरुस्त करुन येथे विकले जाते. 
 
8 हजाराचा बूट अवघ्या 1500 रुपयांमध्ये
- असे म्हणतात की नायके कंपनीचा एअर मॅक्स 2014 स्पोट्र्स रनिंग शूज ज्याची किंमत 8 हजार रुपये आहे. तो दीड गल्लीत अवघ्या 1500 रुपयांमध्ये मिळतो.
- तर कैट कंपनीचा लेदर शूज ज्याची किंमत 8 हजार रुपये आहे. तो येथे फक्त 800 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
 
कोटयावधींचा टर्नओव्हर
- बाजारात शेकडोच्या संख्येने व्यापारी सामान विकण्यासाठी येतात. येथे एका दिवसात 15 ते 20 कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. छोट्या शहरातील व्यावसायिक येथे मोठ्या प्रमाणावर कमी किंमतीचे सामान खरेदी करण्यासाठी येतात.  
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...