आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dnyanoba Tukaram Award Declared To Father Dibrito, Maruti Maharaj

फादर दिब्रिटो, मारुती महाराज यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिध्द साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारुती महाराज कु-हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर केले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या पुरस्कारांची घोषणा केली. संत साहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणा-या किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे आहे. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण व प्रा.रामदास डांगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली . सय्यद भाई, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. प्रशांत सुरु, सिसिलिया कार्व्हालो आणि गुरुप्रसाद पाखमोडे यांनी समितीत काम पाहिले.