आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Action Against Builder And Corporater Says Raj Thackrery

बिल्डर, नगरसेवकांवरही कारवाई करा : राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यात अनधिकृत बांधकाम वाचवण्याचे काम केवळ व्होट बँकेसाठी करण्यात येत असून बिल्डरांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. पालिका अधिका-यांप्रमाणेच दोषी बिल्डर व नगरसेवकांवरही कारवाई करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच अनधिकृत बांधकाम रोखण्याच्या कारवाईला विरोध करण्यासाठी ठाणे येथे गुरुवारी सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या बंदमध्ये मनसे सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिळफाटा येथील इमारत दुर्घटनेबाबत पालिका अधिका-यांवर कारवाई करण्यात आली परंतु तेथील लोकप्रतिनिधींवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करीत राज ठाकरे म्हणाले की, राजकीय हस्तक्षेपामुळेच अनधिकृत बांधकाम वाढत आहेत. ठाणे महापालिकेत अनेक वर्षे कोणाची सत्ता होती हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, मग आत्ताच बेकायदा बांधकामाविरोधात का बोलले जात आहे. अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र कसे आले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रसंगी मनसेवरही कारवाई
शरद पवार यांनी अनधिकृत बांधकामाबाबत उल्हासनगर पॅटर्न राबवावा असे म्हटले आहे. त्याबाबत राज म्हणाले की, असा पॅटर्न राबविल्यास अनधिकृत बांधकामांना वाव मिळेल. अनधिकृत बांधकाम करणारे कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यात मनसेचा पदाधिकारी दोषी आढळला तरी त्याला मी पक्षातून काढून टाकेन. बेकायदा इमारतीतील लोकांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार आहोत.