आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव नको- सुब्रतो रॉय; सेबीला 3 हजार कोटी रुपये देऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात हजर झाले. अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करू नये, ऑक्टोबरपर्यंत सेबीला ३ हजार कोटी रुपये देऊ, अशी विनवणी त्यांनी न्यायालयाला केली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी त्यांना कडक शब्दात सुनावले. ते म्हणाले, सुब्रतो रॉय, तुमची आश्वासने मृगजळासारखी वाटतात. सुब्रतो यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, सहाराने सेबीकडे दोन पोस्टडेटेड चेक सोपवले आहेत. १५०० कोटींचा एक धनादेश जूनचा तर ५५० कोटींचा धनादेश १५ जुलैचा आहे. यावर न्या. मिश्रा यांनी १५०० कोटींचा धनादेश १९ जूनपर्यंत न वटल्यास रॉय यांना तुरुंगात पाठवू, असा इशारा दिला.
बातम्या आणखी आहेत...