आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चा: केवळ चर्चा नकाे, मराठा अारक्षण द्या : धनंजय मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मराठा आरक्षणावर नुसती चर्चा करायची नाही, आम्हाला आता आरक्षण पाहिजे’, अशी मागणी विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. 
विनायक मेटे यांनी कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी मागणी केली हाेती. त्यावर मुंडे म्हणाले, ‘डिसेंबर २०१४ पासून आरक्षणावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे उद्या लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे मराठा हे आरक्षणाची सभागृहात चर्चा व्हावी म्हणून येत नाहीत, तर त्यांना आता अारक्षण हवे अाहे.  त्यामुळे आता चर्चा नको, असे सांगत मुंडे यांनी मेटे यांच्या मागणीवर आक्षेप घेतले. ‘आरक्षण देत नसाल तर तुम्ही सत्तेत असून चर्चा कसली मागता’, असा सवालही मुंडे यांनी मेटे यांना केला, त्यादरम्यान, सभापतींनी  प्रश्नोत्तरे पुकारले. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे सभापतींनी २० मिनिटांसाठी सभागृहाचे तहकूब केले.
बातम्या आणखी आहेत...