आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

162 वर्षापूर्वी आजच्या दिवशी धावली होती मुंबई-ठाणे देशातील पहिली रेल्वेगाडी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या मुंबई-ठाणे रेल्वेला आज 162 वर्ष पूर्ण झाली आहेत. 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या 21 किलोमीटर मार्गावर धावली होती. या ऐतिहासिक घटनेला आज 162 वर्ष पूर्ण झाली आहेत.
तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य इंजिनिअर जॉर्ज क्लार्क यांनी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे ठाण मांडले होते. ठाणे आणि कल्याणला बोरीबंदरच्या मार्गातून मुंबईला जोडण्यासाठी हा विचार सुरु झाला होता. ज्या दिवशी (16 एप्रिल 1853 रोजी) या रेल्वेचे औपचारिक उद्घाटन समारंभ झाले त्यादिवशी 400 पाहुण्यांना बसण्यासाठी 14 डब्ब्यांची रेल्वे गाडी तयार करण्यात आली. सिंध, सुलतान आणि साहिब या तीन इंजिनांद्वारे धावणारी ही गाडी दुपारी 3.35 वाजता बोरीबंदरहून निघून सव्वा तासाने ठाण्याला पोहोचली होती. हजारो टाळ्यांच्या गडगडाटाने व 21 तोपांच्या सलामीनंतर या रेल्वेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.
मागील 162 वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा विस्तार झाला आहे. केवळ 21 किलोमीटर मार्गावरून आज भारतीय रेल्वेचा मार्ग 1 लाख 8 हजार 706 किलोमीटर (मीटरगेजसह) इतका झाला आहे. तर 63 हजार 28 किलोमीटर इतके रूळाचे जाळे परसले आहे. आज भारतात दररोज 11 हजार रेल्वे धावतात त्यात 7 हजार पॅसेंजर आहेत. यासाठी साडेसात हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आणि 15 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी भारतीय रेल्वेत काम करतात.
बातम्या आणखी आहेत...