आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या तपासकामात श्वानच भारी, गुन्हे शाखेत श्वानांच्या समावेशाची ५० वर्षे पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसांच्या गुन्हे शाखेत श्वानांचा समावेश झाल्याला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. या अर्धशतकी प्रवासात आजही शोध मोिहमेत तंत्रज्ञानावर श्वानच भारीच असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मुंबईसारख्या संवेनदशील अशा अांतरराष्ट्रीय शहराचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोिलसांच्या ताफ्यात सध्या २४ श्वान असून काळाची गरज लक्षात घेता त्यात आणखी ८ श्वानांचा समावेश करण्यात येणार आहे.

सत्तरच्या दशकातील गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन गुन्हे शाखेने १३ मे १९६५ रोजी ताफ्यात श्वानांचा समावेश करण्याचे ठरवले. तंत्रज्ञानात नवनवीन संशोधन होत आहे. पण, शोधकामात प्रशिक्षित श्वानांना आजही पर्याय नाही. श्वानांची हुंगण्याची क्षमता ५० पट अिधक असल्याने त्यांचे महत्व वादातीत आहे. एकूण शोधकार्यात ८५ टक्के कामाची भिस्त श्वानांवर असते. त्यामुळे तंत्रज्ञान हे श्वानांसाठी कधीच पर्यायी होऊ शकलेले नाही. विशेषत: मुंबईवरील १९९३च्या बाॅम्बस्फोटानंतर श्वानांचे महत्व कितीतरी पटीने वाढले आहे, असे बाॅम्बशोधक पथकातील वरीष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे.

१९९३चे साखळी बाॅम्बस्फोट असो की, २००६ चा लोकल ट्रेनमधील स्फोट किंवा २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला या वेळी शोध पथकातील श्वानांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी हल्ल्यावेळी मॅक्स श्वानाने ८ किलो आरडीएक्सचा साठा असलेली बॅग शोधून काढली होती. मॅक्सबरोबरच प्रिंस व लायकनेही स्फोटके शोधली होती.

वयाच्या दीड महिन्यांपासून प्रशिक्षण : दीड महिन्यांचे पिल्लू असताना त्याचा ताबा सांभाळ करणा-या पोिलस शिपाई किंवा नायक पदावरील हॅन्डलरकडे दिला जातो. संगोपनासोबतच श्वानाला लळा लावण्याचे कामही हॅन्डलरला करावे लागते. विशेष म्हणजे ज्यांना श्वानांची मािहती तर आहेच, पण त्यांना जपण्याची, शिकवण्याची इच्छा आहे अशांनाच हँडलर नेमले जाते. श्वानांना शिकवण्यापासून ते त्याला प्रतिसाद द्यायला शिकवणे हे कामही हॅन्डलर करतात. एखाद्या घटनेत एकमेकांना साद देत श्वान व हॅन्डरल स्फोटके शोधून काढतात. पुण्यातल्या सीआयडी क्राईमच्या प्रशिक्षण केंद्रात नायट्राेजन, कार्बन अशा स्फोटकांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण श्वानांना देण्यात येते. श्वान व हॅन्डलर दोघेही प्रशिक्षित झाल्यानतंर त्यांचा बाॅम्ब शोधक पथकात समावेश होतो. दर चार वर्षांनी दोघांनाही नव्याने प्रशिक्षण दिले जाते.

आॅस्कर, मायलो नाही, आता जंजीर, वाघ्या!
बाॅम्बशोधक पथकात अनेक वर्षे श्वानांना इंग्रजी नावे देण्याची पद्धतच होती. त्यामुळेच आॅस्कर, मायलो,प्रिंस, लायका अशी प्रसिद्ध श्वानांची नावे माहीत होती. मात्र आता देशी नावे देण्यास सुरूवात झाली असून पथकात नव्याने सामील होणा-या श्वानांना जंजीर, शेरा, राणा, वाघ्या,हिरा अशी नावे दिली आहेत.

बाॅम्बशोधक पथकाची भिस्त लॅब्रॉडाॅरवर!
बाॅम्बशोधक पथकात (बीडीडीएस) लॅब्रॉडाॅरसह डाॅबरमॅन, अल्सेशियन, जर्मन शेफर्ड अशा श्वानांचा समावेश आहे. मात्र बीडीडीएसची भिस्त आहे ती लॅबराॅडाॅरवरच. या श्वानांनी आपल्या जबरदस्त कामगिरीने ते दाखवूनही दिले आहे. स्फोटक वस्तू हुडकण्यात लॅब्रॉडाॅर मािहर असतात. त्यामुळे त्यांचासमावेश प्राधान्याने केला जातो.