मुंबई- 1993 साली मुंबई झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने टाडा कोर्टाकडे लग्नासाठी परवानगी मागितली आहे. त्याच्या अर्जावर न्यायाधीशांनी सीबीआयकडे उत्तर मागितले आहे. तत्पूर्वी मुंब्रा येथील मुलीने कोर्टात अर्ज देऊन सांगितले होते की तिला सालेम सोबत लग्न करायचे आहे. तिने दावा केला होता की तिने रेल्वेत सालेमसोबत लग्न केले आहे. त्यामुळे तिला आता पारंपारिक पध्दतीने हा विवाह करायचा आहे.