आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात गुन्हेगारी तर विदेशात कार्सचा बिझनेस, अशी होती अबू सालेमची लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी अबू सालेमला टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्याला जन्मठेप सुनावली आहे. अबू सालेमच्या काळ्या कृत्याचे अनेक किस्‍से मीडियात प्रसिद्ध आहेत. सांगितले तर हे ही जाते की, दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरूनच अबू सालेमने हे स्फोट घडविले होते. अभिनेत्री मोनिका बेदीसोबतचे त्याचे जवळचे संबंध तर सर्वांनाच माहित आहेत. चोरीच्या लग्जरी कार्स दुबईत विकायचा सालेम....
 
- पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अबू सालेम भारतात गुन्हेगारी कृत्यात सामील असायचा तर येथील दोन नंबरचा मिळालेला पैसा दुबईत गुंतवणूक करून बिझनेस करायचा. 
- 1993 च्या हल्ल्यानंतर भारतात अडकण्याचा धोका लक्षात येताच हा डॉन काही वर्षे मुंबईतून दुबईला पळून गेला. तेथे त्याने ‘किंग्‍स ऑफ कार ट्रेडिंग’ कंपनीची सुरुवात केली. 
- सालेमची किंग ऑफ कार ट्रेडिंग कंपनी कार्सचा बिझनेस करायची. पोलिस सूत्रांनुसार, ही कंपनी जगभरातील चोरीच्या अनेक लग्‍जरी कार्स आपल्या खास नेटवर्कद्वारे दुबईत मागवून घ्यायची. 
- तेथे त्या कारचे रिफर्निश केले जायचे. त्यानंतर पुन्हा चमचमणा-या या कार्स अरबमधील श्रीमंत शेख लोकांना विकल्या जायच्या.
 
स्वत: मर्सिडीजचा वापरायचा डॉन-
 
- डॉन सालेमने दुबईत रियल इस्‍टेट डीलचेही कम करायचा यातून तो मोठी कमाई करायचा.
- त्याच्याजवळ एक मर्सिडीजची एक खास कार होती. याचा नंबर Dubai 4781 होता. 
- याशिवाय तो अनेक स्‍टेज शो सुद्धा करायचा. तेथूनही डॉनला मोठी रक्कम मिळायची. 
- सीबीआयने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, डॉनने रियल इस्‍टेट ट्रान्जेक्‍शनमधून खूप पैसा कमविला.
 
पहिल्या भेटीतच सालेमवर फिदा झाली होती मोनिका-
 
- मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या भेटीतच मोनिका बेदी अबु सालेमवर फिदा झाली होती. सालेमच्या एका स्‍टेज शो दरम्यान मोनिका बेदी आणि अबु सालेम भेटले होते. 
- मोनिकाच्या माहितीनुसार, सालेमसोबत माझा तो वार्तालाप झाला त्यातूनच मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. यानंतर हे दोघांत जवळचे संबंध निर्माण झाले. 
- मोनिका बेदी आणि सालेमचे अनेक काळ वर्षे संबंध राहिले. जेव्हा सालेमलाब पोर्तूगालमध्ये ताब्यात घेतले होते तेव्हा सालेमसोबत मोनिका सुद्धा आढळली होती. 
- दोघे अमेरिकेतील न्‍यू जर्सी शहरातून पोर्तूगालमध्ये पोहचले होते. जेथे भारताच्या विनंतीनंतर पोर्तूगाल अधिका-यांनी अटक केली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमबाबत....
बातम्या आणखी आहेत...