आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी दूध विकायचा अरूण गवळी, दाऊदनंतर मुंबईवर चालायचे याचे राज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अर्जुन रामपाल याला मुंबई पोलिसांनी गॅंगस्टर अरुण गवली याला भेटल्याने समन्स बजावले होते. यानंतर अर्जुन यानेही स्पष्टीकरण दिले होते. रामपालने म्हटले होते की, गवळी यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी भेटलो. आपल्याला माहित असेलच की, कधी काळी दूध विकून उदरनिर्वाह करणारा अरूण गवळीचे मुंबईवर राज चालत होते. गुन्हेगारी जगातून राजकारणात त्याने पाऊल ठेवले व आमदारही बनला. आता डॉन अरुण गवलीवर लवकरच चित्रपट येत आहे. चित्रपटाचे शीर्षक आहे 'डॅडी'. आपल्या जीवनावर चित्रपट बनविण्यास अरुण गवळीने परवानगी दिली आहे. चित्रपटात गवळीची प्रमुख भूमिका अर्जुन रामपाल साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव बावदनकर करणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आपल्या समर्थकांत 'डॅडी' नावाने परिचित आहेत. सध्या अरूण गवळी शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात जन्मठेप भोगत आहे.
गवळीचे वडील मध्यप्रदेशातून आले होते मुंबईत-
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव कामधंद्यासाठी मुंबईत पोहचले होते. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरूण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली. यानंतर वडीलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. 1980 च्या दरम्यान गवळी राम नाईक गॅंगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.
दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज-
1993 मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट ढाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरु केला. त्यामुळे अरुण गवलीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. त्याचदरम्यान त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले व तोही अट्टल गुन्हेगार बनला.
पुढे वाचा, गवळीच्या परवानगीसाठी पोलिस थांबायचे...
बातम्या आणखी आहेत...