आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : डॉन अरुण गवळीच्या मुलाचा शाही विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीचा मुलगा महेश व नागपूरची कन्या कृतिका अहिर यांचा शाही विवाह साेहळा शनिवारी रात्री मुंबईतील महालक्ष्मी रेसकाेर्सच्या मैदानावर पार पडला. एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या डाॅन अरुण गवळीला न्यायालयाने पॅराेल मंजूर केल्यामुळे ताे स्वत: या विवाह साेहळ्यास उपस्थित राहू शकला. राजकीय क्षेत्रातील नेते, बिल्डर, उद्याेजक व पाेलिस अधिका-यांपर्यंत या विवाहाची निमंत्रणे देण्यात अाली हाेती. मात्र गवळीची पार्श्वभूमी पाहता अनेकांनी हजेरी लावणे टाळले. गवळीचा मुलगा महेश हा बिल्डर असून कृतिका ही नागपूरच्या कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षात शिकते. गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी त्यांचा साखरपुडा झाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...