आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डॉन\'च्या मुलाची LOVE स्टोरी: पाहता क्षणीच पडला प्रेमात, आता विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश आणि कृतिका - Divya Marathi
महेश आणि कृतिका
मुंबई- डॉन अरुण गवळी याचा मुगला महेश याचे लग्न मुंबईत 9 मे रोजी होत आहे. कोर्टाने गवळीला मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 15 दिवसाचा पॅरोज मंजूर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गवळीचा मुलगा महेश आणि कृतिका अहीर यांच्या विवाहाला अनेक हाय-प्रोफाईल व्यक्तींना आमंत्रित केले आहे.
27 वर्षीय महेश आणि कृतिका यांना एकमेंकाना पाहताच प्रेम झाले होते. दोघांच्या घरच्यानी महेशचे पिता आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भेटून हे लग्न निश्चित केले. विशेष म्हणजे या लग्नाची बैठक कुठे घरी, रेस्टोरंट अथवा हॉटेलमध्ये नाही तर जेलमधील चार भिंतीच्या आड ठरवले गेले. आपल्याला माहित असेलच की, शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
येथे झाली होती पहिली भेट-
गवळींचा एकुलता एक मुलगा महेश (27) रियल इस्टेट बिझनेस करतो. महेश आणि कृतिका यांच्यात प्रेमाची सुरुवात नागपूरमध्ये असतानाच झाली होती. महेश नागपूरमध्ये एक लग्नसमारंभाला गेला असता तेथे त्याने सर्वप्रथम कृतिकाला पाहिले होते. कृतिका एक प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर आहे. कृतिका सध्या नागपुरमध्ये डॉ. बाबाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये कॉमर्सच्या दुस-या वर्षात शिकत आहे.
असे ठरले लग्न-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि कृतिका यांचे लग्न नागपूरमधील जेलमध्ये ठरले. अरुण गवळीला जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्याला नागपूर जेलमध्ये हलविण्यात आले. त्यावेळी कृतिकाचे आई-वडिल त्याला भेटायला गेले होते. तेथेच महेश आणि कृतिका यांचे लग्न ठरवले गेले. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स स्थित मेन इनक्लोजर टर्फ क्लबमध्ये 9 मे रोजी महेश आणि कृतिका याचे लग्न होईल. लग्नाच्या आदल्या दिवशी 8 मे ला गवळीच्या दगडी चाळीत हळदीचा कार्यक्रम पार पडेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा कृतिका आणि महेश यांचे PHOTOS...