आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकुलता एक मुलगा मौलाना बनल्‍याने दाऊद नैराश्‍याच्‍या गर्तेत- इकबाल कासकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदवर 1993मध्ये मुंबई येथे झालेल्‍या सिरीयल बॉम्‍ब स्‍फोटचा आरोप आहे. - Divya Marathi
दाऊदवर 1993मध्ये मुंबई येथे झालेल्‍या सिरीयल बॉम्‍ब स्‍फोटचा आरोप आहे.

ठाणे- 1993 मुंबई बॉम्‍ब स्‍फोटातील  मोस्ट वॉटेंड आरोपी आणि कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्‍याच्‍या गर्तेत गेल्‍याची माहिती आहे. दाऊदचा एकुलता एक मुलगा फॅमिली बिझनेसमध्‍ये न शिरता मौलाना बनल्‍यामुळे दाऊद डिप्रेस झाल्‍याची माहिती आहे. 31 वर्षीय मोईन नवाज दाऊद कासकर हा दाऊदचा एकुलता एक मुलगा आहे. ठाण्‍याच्‍या अँटी एक्‍टॉर्शन सेलचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, 'मोईन दाऊदच्‍या बेकायदेशीर कृत्‍यांच्‍या विरोधात होता. त्‍यामुळे संपूर्ण कुटुंबाची जगभरात बदनामी होत असल्‍याचे त्‍याचे म्‍हणणे आहे.'


मशिदीमध्‍ये राहत आहे मोईन
- दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकरच्‍या चौकशीदरम्‍यान ठाणे पोलिसांना ही माहिती मिळाली. प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, 'दाऊदच्‍या अवैध धंद्यामुळे कुटुंबात अशांती निर्माण झाली होती. यामुळे मोईन खूप दु:खी झाला होता. त्‍यामुळे त्‍याने घर सोडण्‍याचा निर्णय घेतला.'
- कासकरने पोलिसांना सांगितले की, 'मोईन एक चांगला मौलाना बनला आहे. कराची येथील क्लिफ्टन परिसरातील अलिशान बंगला सोडून त्‍याने जवळच्‍या एका मशिदीमध्‍ये आश्रय घेतला आहे. त्‍याची पत्‍नी सानिया आणि 3 मुलेही त्‍याच्‍यासोबत मशिदीमधील एका छोट्याशा घरात राहत आहे.'  

 

कासकरने यापूर्वी केले 6 खुलासे
सप्‍टेंबरमध्‍ये खंडणीच्‍या आरोपाखाली इकबाल कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तेव्‍हापासून कासकरने दाऊदबद्दल अनेक खुलासे केले आहेत
1) दाऊद भारतातील आपल्‍या नातेवाईकांशी बोलत नाही.
2) इकबालने दाऊदला दारु सोडण्‍याचा सल्‍ला दिला होता.
3) कराचीमध्‍ये राहत आहे दाऊद.
4) दाऊद नेहमी आपले ठिकाण बदलत असतो.
5) या खंडणीच्‍या केसमध्‍ये दाऊदचा कोणत्‍याही प्रकारे सहभाग नाही.
6) 2016मध्‍ये इकबालच्‍या पूर्ण कुटुंबाने दुबईमध्‍ये दाऊदची पत्‍नी मेहजबीनशी भेट घेतली होती.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, 2003मध्‍ये कासकरला प्रत्‍यार्पण करुन आणले होते भारतात...  

बातम्या आणखी आहेत...