आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे दिवानों, मुझे पहचानो... डाॅनचे मुंबईत जाेरदार स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ "डॅडी' मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर मंगळवारी नागपूर तुरुंगातून बाहेर आला. तो मुंबईला परतताच स्वागतासाठी नातेवाइक-इष्टमित्रांची एकच गर्दी झाली. इतकेच नव्हे अरुण गवळीसह सर्वांनीच नाचत सेलिब्रेशन केले. नागपूर तुरुंगातून बाहेर पडताना गवळीच्या स्वागतासाठी तीनशेवर कार्यकर्ते हजर होते. सात लक्झरी वाहनांसह मागे-पुढे पन्नासवर दुचाकीस्वारांचा ताफा होता.

*यासाठी शिक्षा : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीला २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला १६ मार्च २०१५ रोजी मुंबईवरून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले.

*यासाठी पॅरोल : महेश अरुण गवळीचे ९ मे रोजी मुंबईत लग्न आहे. महेशची सासुरवाडीही नागपुरातील आहे. मुलाच्या लग्नासाठी हजर राहता यावे म्हणून गवळीने पॅरोलसाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी अरुण गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला.