आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: मुंबईतील 1993 साखळी स्फोटातील दोषी मेमनला 30 जुलैला फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन याकूब मेमनला ३० जुलै रोजी फासावर लटकवले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील टाडा न्यायालयाने ५३ वर्षीय याकूब मेमनच्या फाशीचा वॉरंट जारी केला आहे. त्यानुसार याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत २२ वर्षे गेली आहेत.

टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकूबला भादंविच्या कलम १२० अन्वये गुन्हेगारी स्वरूपाचा कटात दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर याकूबने मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे अपील दाखल केले होते. परंतु त्याला दिलासा मिळाला नाही. आता याकूबकडे क्युरेटिव्ह याचिका हा एकमेव पर्याय असून त्यावर फाशी देण्यापूर्वी सुनावणी होऊ शकते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झालेला याकूब एकमेव आरोपी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकूबच्या फाशीची तारीख वेळेला मंजुरी दिली आहे. न्यायालय नागपूर तुरुंग प्रशासनालाही माहिती दिली आहे. कोणत्याही आरोपीला फाशी देण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना १५ दिवस आधी माहिती देणे बंधनकारक आहे.

याकूबवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक अथवा मानसिक दबाव नाही ना याची खातरजमा करण्यासाठी तुरुंगामध्ये त्याच्या प्रकृतीची सातत्याने देखभाल करण्यात येत आहे. त्याने त्याच्या वकिलाशी भेटण्यासही नकार दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या याकूब मेमनला २७ जुलै २००७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली.