आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R R Patil Responding Treatment In Lilawati Hospital Read More At Divya Marathi

आर. आर. पाटलांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका - स्मिता पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कन्येने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून आबा उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून समर्थकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पाटील यांच्या कुटुंबियांनी केले आहे.
तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे आबांवर मागील काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर नुकतीच रेडिएशन थेरपी पूर्ण झाली असून, सध्या केमोथेरपी सुरु असल्याची माहिती आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी दिली. तसेच आबांवर सुरू असलेल्या उपचारांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आबांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या अंजनी या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता.