आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Don't Discrimination In Illeagal Constraction : Hight Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत बांधकामांबाबत भेदभाव करू नका : उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई । राजकीय पक्षांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पालिकेने अजिबात भेदभाव करू नये, अशी सज्जड तंबी देताना उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे गैरप्रकार करणारे राजकारणी आणि नोकरशहांचे भयावह वर्तुळ भेदण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. अजित सावगावे यांनी ठाण्यातील बेकायदा बांधकामांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

शहरातील 122 अनधिकृत बांधकामांपैकी 22 बांधकामे राजकीय पक्षांनी व्यापलेली असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्या वेळी न्यायालयाने अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्यासंदर्भातील आपल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, या बांधकामांवर कारवाई न केल्यास आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशी सज्जड तंबीही महापालिका प्रशासनाला दिली.