आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचा आता \'यू-टर्न\'; संजय दत्तला माफी नको- निलम गो-हेंचे विधानपरिषदेत मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी झालेला व शिक्षा झालेल्या संजय दत्तला माफी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे यांनी विधानपरिषदेत केली. याआधी शिवसेनेनी संजय दत्तला माफी देण्यात यावी असे मत व्यक्त केले होते. मात्र आता सेनेनेच संजय दत्तविषयी यू-टर्न घेतला असून, यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्याने चर्चा रंगणार आहे.

संजय दत्तला शिक्षा झाल्यानंतर त्याबाबत अधिक राजकारण होत असल्याचे लक्षात येताच मुंबईकरांच्या भावनांना हात घालत सेनेने आपली भूमिका बदलली असण्याची शक्यता आहे. संजय दत्तला याआधी तो ज्या पक्षाचा सदस्य आहे त्या समाजवादी पक्षाने माफी द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. त्याच्याच सुरात सूर मिसळत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनीही संजयला माफी मिळायला हवी, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसने संजय दत्तबाबत नमती भूमिका घेत याबाबत सरकार कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मक निर्णय घेईल, असे सुतोवात केले. त्यामुळे शिवसेनेला यात आपल्याला फारसे मायलेज मिळत नसल्याचे लक्षात विरोधी घेतली असण्याची शक्यता आहे. कारण १९९५ च्या काळात संजय दत्त जेव्हा तुरुंगात होता त्यावेळी सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरेंशी यशस्वी तह करीत संजयला तुरुंगात बाहेर काढण्यास मदत केली होती. आता मात्र संजयने शिक्षा झाल्यानंतर शिवसेनेला फारसे महत्त्व दिले नाही. कारण संजय आता राजकीय क्षेत्रात आला आहे. त्यातच तो व त्याचे कुटुंबिय धर्मनिरपेक्षवादी समजल्या जाणा-या समाजवादी पक्षात व काँग्रेस पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे सेनेला त्याचा काहीही फायदा होणार नाही, असा सूर सेनेतून उमटत होता. संजय दत्तला माफी द्या अशी मागणी करुन आपण मुंबईकरांच्या जखमांना चोळत आहोत, असा समज होईल, अशी शक्यता गृहित धरुन सेनेने अखेर संजय दत्तला माफी देऊ नये, असे सांगत आज यू-टर्न घेतल्याचे दिसून येत आहे.