आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळी भागांत क्रिकेट सामने नकाे : हायकाेर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात ज्या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते, अशा भागांत क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाऊ नये. यामुळे या वर्षी एप्रिलमध्ये आयोजित स्पर्धेतील सामने जसे ऐनवेळी बदलावे लागले तशी स्थिती टाळता येऊ शकेल, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत.
तुम्ही (बीसीसीआय) आम्हाला मदत करा. आयपीएलचे आयोजन पुढच्या वर्षीही होईल. तेव्हा पुन्हा दुष्काळाच्या काळात हाच प्रश्न उद््भवू शकतो. ज्या भागांत मैदानांसाठी आवश्यक असलेले पुरेसे पाणी मिळू शकत नसेल तिथे सामने घेऊ नका. बीसीसीआयने याची काळजी घ्यावी. त्यांनी याबाबत त्यांच्यावर असलेली जबाबदारी झटकून चालणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात दरवर्षी अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे सरकारने आवश्यक पाऊल उचलण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल
करण्यात आल्या. याच्या एकत्रित सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या पीठाने बीसीसीआयला वरील सूचना केली.
बातम्या आणखी आहेत...