आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Spoil Ganesh Festivel, Prithiviraj Chavan Urged People

उत्सवाला गालबोट लागू देऊ नका, पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गणेशोत्सव हा संपूर्ण राज्याचा कौटुंबिक उत्सव आहे. आगामी दहा दिवसांत नागरिकांनी शिस्त पाळावी. उत्सवाला कोठेही गालबोट लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले.


मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी सत्त्वशीला यांनी सोमवारी बाप्पाची सपत्नीक प्रतिष्ठापना केली. पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
‘उत्सवादरम्यान काही समाजकंटक गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला आहे. त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. वाहनांची कोंडी कोठेही होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी,’ असे आवाहनही चव्हाण यांनी केले. यंदा मुंबईबरोबरच राज्यातील महानगरांमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात बसवले आहेत. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणे सोपे जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


महिलांची छेडछाड झाल्यास संबंधित गणेश मंडळाची मान्यता रद्द करण्यात येईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह म्हणाले आहेत, त्याबाबत बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. ‘वर्षा’वरील बाप्पासाठी यंदा फुलांचे सुंदर मखर बनवण्यात आले असून टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाची विधिवत पूजा पार पडली.