आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Worry About Me: France's Ex First Lady Valerie Trierweiler

मी आनंदी आहे : व्हॅलेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कॉइस ओलांद आणि त्यांच्या सहचारिणी व्हॅलेरी ट्रिरवीलर यांच्यात फाटल्यानंतर व्हॅलेरी सोमवारी भारतात दाखल झाल्या. माझी काळजी सोडा. मी आनंदी आहे, अशा शब्दांत त्यांनी वैयक्तिक प्रश्नांना बगल दिली. विमानतळावर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. ओलांद यांच्या आयुष्यात अभिनेत्री ज्युलिया गाएत आल्याने दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना गेल्या आठवड्यात ऊत आला होता. त्या पार्श्वभूमीवर व्हॅलेरी यांनी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच त्यांचे दर्शन दिले.