मुंबई - देशात आज 69 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, गुगलनेही खास डुडल तयार करून भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
नेमके काय आहे डुडुलमध्ये
स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने गुगलने तयार केलेला डुडलमध्ये महात्मा गांधींनी नेतृत्त्व केलेल्या दांडी यात्रेचे रेखाचित्र आहे. समोर गांधींजी काठी घेऊन चालत आहेत. त्यांच्या पाठोपाठ इतर स्वातंत्र सैनिक आहेत.