आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Killers Evidence Recovered Sushilkumar Shinde

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचे धागेदोरे मिळालेत - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांपर्यंत पोहोचण्यास उपयुक्त असे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी राज्य सरकार पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी मुंबईत सांगितले.
शिंदे म्हणाले, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारी माध्यमे आज सर्वशक्तिमान बनली आहेत. त्यामुळे देशातील राजकारणी माध्यमांना फारच वचकून असतात. गृह विभागाच्या बातम्यांबद्दल मी तर रोजच चिंतेत असतो. या कार्यक्रमाला काँगे्रसच्या पदाधिका-यांनी मोठी गर्दी केली होती.
बाळासाहेबांचे स्मारक का नको?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आक्रमक संघटन चालवले. शिवसेनेविषयी माझी मते वेगळी आहेत. परंतु त्यांचे वडील केशव ठाकरे (प्रबोधनकार) यांची भूमिका कायम चातुर्वर्ण्यविरोधी राहिली. बाळासाहेबांचेही पत्रकारितेपासून राजकारणापर्यंत मोठे योगदान आहे. अशा नेत्यांचे स्मारक होण्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित करत स्मारक समितीचा सदस्य झाल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्यावर पाळत ठेवायची असेल तर केंद्र किंवा राज्याच्या गृहसचिवाची त्यास संमती लागते. गुजरातमध्ये एका महिलेवर बेकायदा पाळत ठेवून मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी राज्य यंत्रणेचा एक प्रकारे गैरवापर केल्याचे ते म्हणाले.
आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी चौकशीला सामोर जायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.