आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Rajendra Gavai Blame On Pawar, Latest News In Divya Marathi,

‘रिपाइं’ संपवण्याचे पवारांचे षड्यंत्र - डॉ. राजेंद्र गवई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आघाडीतील घटक पक्षांना लोकसभेचे तिकीट द्यायचे, पण घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची सक्ती मात्र करायची, असे दुटप्पी धोरण राष्‍ट्रवादी ने अंगीकारले आहे. यामागे रिपाइं गटाचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप ‘रिपाइं’च्या गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
राष्‍ट्रवादी पक्षाशी गवई गटाची मागील दोन वर्षांपासून आघाडी आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडण्यात आला आहे. मात्र, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घालण्यात आल्याचा खुलासा गवई यांनी केला. रिपाइंच्या गवई गटाला निवडणूक चिन्ह नाही, परंतु याचा अर्थ राष्‍ट्रवादी च्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा होत नाही. अशी निवडणूक लढवली तर मी राष्‍ट्रवादी चा उमेदवार ठरण्याची शक्यता असल्याची भीती गवई यांनी व्यक्त केली.
तर स्वतंत्र उमेदवार देऊ
राष्‍ट्रवादी च्या चिन्हावर मी कदापि लढणार नाही. भले आमची युती तुटली तरी चालेल. राष्‍ट्रवादीने आपला हेका असाच ठेवला तर आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइं गट 20 उमेदवार उभे करेल, असा इशाराही गवई यांनी दिला. शरद पवार यांना रिपाइंशी युती चालते, मग आमचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना का डाचावे, असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी सामाजिक समीकरणे कधी बिघडवली नाहीत. आगामी निवडणुकीतही त्याविरोधी ते वागणार नाहीत, अशी अपेक्षाही गवई यांनी व्यक्त केली.