आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन आराखडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंदू मिल येथे बांधण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी विविध कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या आराखड्यांपैकी दोन आराखड्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एका सवरेत्कृष्ट आराखड्याची निवड लवकरच केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. निवड होणार्‍या आराखड्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मारकाच्या कामासाठी एमएमआरडीएची निवड केली. इंदू मिलमधील 4.84 हेक्टर जागेवरील स्मारकासाठी एमएमआरडीएने आराखडे मागवले होते. मे. मुरालाज, सौमय्या अँड कलप्पा कन्सल्टंट, जेकॉब-मॅकफार्ल-अँन, व्ही. एस.पी. बी. असोसिएटस, मे. लोकस, जैन अँँड असोसिएट्स, शशी प्रभू अँड असोसिएट्स, यू. डी. पी. इंटरनॅशनल, मे. जी.एम.पी. इंटरनॅशनल आणि मे. अँस्मिपटोट आर्किटेक्चर अशा अमेरिका, र्जमनी, हाँगकाँग, फ्रांस येथील कंपन्यांनी भारतीय कंपन्यांच्या सोबत आपले आराखडे सादर केले होते. 13 कंपन्यांपैकी रुची दाखवली होती त्यापैकी दहा कंपन्यांची निवड एमएमआरडीए ने केली होती. या आराखड्यांमधून सवरेत्कृष्ट आराखडा निवडण्यासाठी एमएमआरडीएने समिती नेमली. या समितीने दोन आराखडे निवडले आहेत.

ग्रंथालय, ऑडिटोरियमही
या आराखड्यात ऑडिटोरियम, बौद्ध धर्माबाबत व डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके असलेली भव्य लायब्ररी, भिक्षुंना प्रार्थना करण्यासाठीही हॉल, सहा डिसेंबरला आंबेडकरी जनतेची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रचंड मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. त्यांच्यासाठी शौचालये, राहाण्याची व आंघोळीची सोयही आहे. भरपूर सूर्यप्रकाश यावा अशी योजनाही करण्यात आली असून संपूर्ण स्मारक विविध प्रकारच्या झाडांनी सजवले जाणार आहे.