आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. प्रकाश आमटे यांना ‘मदर तेरेसा पुरस्कार’ जाहीर, अनुराधा कोईराला यांचाही सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि नेपाळच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह १० जणांना हार्मोनी संस्थेचा सामाजिक न्यायासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी मंदाकिनी आमटे यांच्यासोबत हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी केलेल्या कार्यांची ओळख सर्वांनाच आहे. त्यांच्या या समाजकार्याचा गौरव म्हणून हार्मोनी संस्थेच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच मानवी तस्करीच्या जाळ्यातून सुमारे १२ हजार महिलांची सुटका करणा-या अनुराधा कोईराला यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून नेपाळ-भारत सीमेवर सुरू असलेल्या मानवी तस्करीविरोधात त्यांचा लढा सुरू आहे.