आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar London House News In Marathi

बाबासाहेबांचे घर खरेदीसाठी उच्चायुक्तांना इरादापत्र - शिक्षणमंत्री विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्य ज्या घरात होते ते घर खरेदी करण्यासंदर्भात राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले असून लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना घर खरेदीचे इरादापत्र पाठवले असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेसाठी विनोद तावडे नुकतेच लंडन इथे गेले होते. त्या वेळी त्यांनी यासंदर्भात बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास यांच्याशी संपर्क साधला. बाबासाहेब राहत असलेले घर खरेदी करण्यासंदर्भातील व्यवहाराची माहिती घेतली होती.
तावडेंची निवासस्थानी भेट
सदर घर विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आणि सदर घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तावडे यांनी भारतीय उच्चायुक्तांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या निवासस्थानाला भेटही दिली होती. इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, संतोष दास व तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून, कायदेशीर बाबी तपासून आणि परराष्ट्र खरेदीचे नियम पूर्ण करून पुढील दोन महिन्यांत यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले हाेते.
इंदू मिलच्या विलंबाची कसर ‘स्मारका’तून भरून काढणार
ब्रिटनमधील शिक्षणाच्या काळात १९२०-२२ या कालावधीत डॉ. आंबेडकर यांचे या इमारतीत वास्तव्य होते.

एप्रिलला म्हणजेच बाबासाहेबांच्या जन्मदिनी या िनवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याचा सरकारचा मानस आहे.

दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर स्मारक साकारण्यास लोकशाही आघाडीने िवलंब लावला. त्या पार्श्वभूमीवर सरकार लंडनमधील िनवासस्थानाचे स्मारक साकारत आंबेडकरी समाजाला िवशिष्ट संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानण्यात येते.