आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar\'s 124th Birth Anniversary

महामानवाला अभिवादन: चैत्यभूमीसह दीक्षाभूमीवर भीमसैनिकांची रीघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 124 वी जयंती आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे. दरम्यान, मुंबईतील चैत्यभूमीवर राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच तेथे उपस्थित असलेल्या भीमसैनिकांशी संवाद साधला. त्याआधी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली. खासदार रामदास आठवले यांच्या आरपीआयकडून चैत्यभूमी ते इंदूमिल अशी विजय रॅली काढण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांच्यासह आंबेडकर चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते.
दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन राज्य व केंद्र सरकारने न केल्यामुळे काँग्रेसने राज्य व केंद्र सरकारने निषेध आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मारकाचे मुंबईतील इंदूमिलच्या जागेवर भूमीपूजन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. खासदार आठवले यांनीही याबाबत माहिती दिली होती. मात्र, पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री जर्मनीतील हॅनोव्हर येथे बिझनेस मिटला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आज होणारे भूमिपूजन पुढे ढकलल्याची चर्चा सुरु आहे. नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त प्रतिकात्मक भूमीपूजन करून आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. सरकारमधील एकही बडा मंत्री व नेता चैत्यभूमीवर हजर न झाल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली.
पुढे आणखी वाचा, महामानवाला गुगलकडून डुडलद्वारे अनोखे वंदन...