आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब 2007 पासूनच होते आजारी, डॉ. जलील यांची कोर्टात साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सन 2007 पासूनच आजारी होते, अशी साक्ष बाळासाहेबांची दररोज तपासणी करणारे खाजगी डॉ.जलील पारकर यांनी मुंबई हायकोर्टात दिली. बाळासाहेब जेव्हाही घराबाहेर जायचे, तेव्हा लिलावती रुग्णालयाचा विशेष मेडिकल स्टाफ त्यांच्यासोबतच असायचा, असेही डॉ.पारकरांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेब यांच्या मृत्यूपत्रवरुन वाद निर्माण झाल्याने या प्रकरणी साक्षीदार म्हणून डॉ. पारकर यांचा जबाब नोंदवला. डॉ.पारकर यांनी साक्षीदार म्हणून मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे ही बाळासाहेबांची मुले आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रवरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. 13 डिसेंबर, 2011 रोजी बनवण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या अंतिम मृत्यूपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा वाटा देण्यात आला आहे. त्या तुलनेत जयदेव यांना फार कमी वाटा मिळाला आहे.

जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राच्या वैधतेवरच आक्षेप नोंदवला आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर नसताना या मृत्यूपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा आरोप देखील जयदेव यांनी केला आहे. परंतु, हे मृत्यूपत्र सत्य असून ते ग्राह्य धरावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायाधीश गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

बाळासाहेबांचे मृत्युपत्र बनवताना साक्षीदार म्हणून डॉ. पारकर यांची स्वाक्षरी केली होती. त्यामुळे या प्रकरणात डॉ. पारकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण होती. दरम्यान, बाळासाहेबांचे 17 नोव्हेंबर, 2012 मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्‍ट्र शोकाकुल झाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून दोन सख्ख्या भावांमध्ये जुंपली...