आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरांच्या लंडन येथील घराची खरेदी मेअखेरीस पूर्ण - बडाेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराची खरेदी प्रक्रिया मार्गी लागली असून येत्या मेअखेरीस ती पूर्ण होईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. डॉ. आंबेडकर यांचे १९२१ ते १९२३ मध्ये लंडनच्या ज्या १०, किंग्ज हेन्री रोड या वास्तूमध्ये वास्तव्य होते, त्या वास्तूच्या खरेदीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याबाबतच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी बडोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि सचिव उज्ज्वल उके यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच लंडनला जाऊन परतले. तेथील व्यवहाराची प्रक्रियेची माहिती बडोले यांनी दिली.